Ladki Bahin Online Arj:महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये रोख स्वरूपात खात्यावरची जमा केले जाणार आहेत यासाठी शासनाने विहित केलेले काल मर्यादेमध्ये अर्ज करावयाचे आहेत. सदर योजने करता अर्ज करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असून ज्या लोकांना ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात अशा लोकांनी ऑनलाईन ॲप द्वारे अर्ज सादर करायचे आहेत तर ज्या लोकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत अशा लोकांनी ऑफलाइन अर्ज हे अंगणवाडी सेविका यांच्याकडे करणे गरजेचे आहे. Ladki Bahin Online Arj
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: उत्पन्नाचा दाखला नसला तरीही मिळणार महिन्याला दीड हजार रुपये, नवीन पर्याय पहा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन्ही पद्धतीने करता येणार आहेत.
ऑनलाइन अर्ज राज्य सरकारच्या नारीशक्ती दूत या मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र वर जाऊन करता येऊ शकतात. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिलांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करू शकतात अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन अॅप द्वारे अपलोड करतील यासाठी अंगणवाडी सेविकांना कुठलाही मोबदला देण्याची गरज नाही यासाठी अंगणवाडी सेविकांना शासन 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देणार आहे. cm Ladli Bahin Online Arj
ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Ladki Bahin Online Arj
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या application विषयी माहिती दिलेली दिसेल.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत. मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे. Ladki Bahin Online Arj
यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे.
मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल. Ladli Bahin Online Arj
यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे.
पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे. Ladki Bahin Online Arj
शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे.
पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.Ladli Bahin Online Arj
अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे.
आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे. Ladki Bahin Online Arj
यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत- Ladli Bahin Online Arj
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.
- उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
- अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे. Ladki Bahin Online Arj
Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.
अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल. Ladki Bahin Online Arj