mazi ladki bahin 1st installment date लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात कधी येणार? पाह तारीख

mazi ladki bahin 1st installment date:महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. सदर योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरू शकता. सदर योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने विविध केलेल्या पात्रतेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना सदर योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“लाडकी बहीण” योजनेसाठी घरबसल्या करा मोबाईलवरून अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सरकार योजना प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये सेतू केंद्राने ग्रामपंचायत मध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. मात्र प्रचंड गर्दी झाले ना अनेक महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. याचा फायदा घेत काही दलाली पैसे घेऊन लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरून देण्याचा धंदा सुरू केला आहे. mazi ladki bahin 1st installment date

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण असणार पात्र

  1. सदर योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  2. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  3. 65 वर्षे पेक्षा वय जास्त असल्यास अपात्र ठरवले जाणार.
  4. कुटुंबात सरकारी नोकरीला सदस्य असल्यास लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र कोण असणार

  1. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंब या योजनेत आपात्र असतील
  2. घरात कोणी जर करदते असतील तर
  3. कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर.
  4. कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  5. कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून

अर्ज भरताना लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. रहिवाशी दाखला
  5. बँक पासबुक
  6. अर्जदाराचा फोटो
  7. जन्म प्रमाणपत्र
  8. लग्नाचे प्रमाणपत्र

कधी मिळणार योजनेचा पहिला हप्ता mazi ladki bahin 1st installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरणे सुरू असून या योजनेअंतर्गत 15 जुलै पर्यंत फॉर्म भरून घेतले जाणारा असून त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरती सदर योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालया वरती प्रसिद्ध केली जाईल.

यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र कुटुंबांना मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावरती 15 जुलै नंतर जमा केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top