cm mazi ladki bahin yojana नमस्कार मित्रांनो आपल्या सिंह माझी लाडकी बहीण योजना या पोर्टल वरती स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत महिलांना स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश ठेवून ही योजना सुरू केली आहे. सदरचे योजनाही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जाणार आहे. सदर योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.cm mazi ladki bahin yojana
शासन निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन ही योजना महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 महिला व बालविकास विभाग यांच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहे.
योजनेचे स्वरूप cm mazi ladki bahin yojana
पात्रता कालावधी मध्ये प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेले थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खातेदार यांना दर महिना 1500 रुपये इतके रक्कम दिली जाईल.
सदर योजनेसाठी कोण पात्र असणार
- सदर योजनेसाठी महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावी
- किमान वय हे 21 वर्षे व कमाल वयाची मर्यादा ही ६५ वर्षे असावी
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिलांचे बँक खाते असावे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
योजनेसाठी कोण पात्र असणार नाही
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे
- ज्यांचे कुटुंब आयकर दाता आहेत
- ज्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी असतील
- सदर योजनेअंतर्गत महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा पंधराशे रुपये पेक्षा अधिकचा लाभ घेतलेला नसावा
- ज्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत.
- ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून असे कुटुंब अपात्र असतील.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक आहेत.
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्याच्या आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशन कार्ड
- सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र
लाभार्थी निवड प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खासदार जमा करून ऑनलाईन प्रमाणीत केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर कराव सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजने करता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. cm mazi ladki bahin yojana
अर्ज करण्याची प्रक्रिया
सदर योजनेसाठी अर्ज वेब पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेले आहे.
- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल
- ज्या महिलाच ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यास सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असेल
- वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सुरत सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारी ऑनलाईन प्रवेश केला जाईल आणि प्रत्येक यशस्वी चा दाखल केलेला अर्जासाठी याचा योग्य पोचपावती दिली जाईल.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य असेल.
- अर्जदार महिलेने स्वतः उपलब्ध ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि ही केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड
- स्वतःचे आधार कार्ड
यादीचे प्रकाशन
अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल अँप वर जाहीर केली जाईल त्याची प्रत्येक अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.
अंतिम यादी चे प्रकाशन
सदर समिती मार्फत प्राप्त हरकतीचे निराकार करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल.
सदर अंतिम यादीतील महिलामृत झाल्यास सदर महिलाचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.
लाभाच्या रकमेचे वितरण
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मार्फत रक्कम जमा केली जाईल. cm mazi ladki bahin yojana
निष्कर्ष
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिना पंधराशे रुपये लाभ थेट हस्तांतर या योजनेअंतर्गत भेटणार असल्यामुळे सदर योजनेमुळे महिलांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. cm mazi ladki bahin yojana